बनावट करन्सीचा गैरवापर करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

बनावट करन्सीचा गैरवापर करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलिसांनी 500 रुपयांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून, या कारवाईमुळे धुळे शहरात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी सांगितले की, चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटलजवळील एका पेट्रोल पंप मॅनेजरने चाळीसगाव रोड पोलिसांना खबर दिली की, एक व्यक्ती 500 रुपयांची बनावट नोट घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला आहे. माहिती मिळताच, चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी संशयित आरोपी नासिर सत्तार याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा आढळून आल्या. त्याची कसून चौकशी केली असता नासिरने या बनावट नोटा संशयित संतोष चौधरी याच्याकडून घेतल्याचे सांगितले. चाळीसगाव रोड पोलिसांनी नासिर शेख आणि संतोष चौधरी या दोघांनाही पाचशेच्या वीस बनावट नोटांसह ताब्यात घेतले आहे.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *