सोलापुरातील शेतकरी करतोय चक्क कढीपत्त्याची शेती ; वर्षाकाठी तीन ते चार लाखांची कमाई..
सोलापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर डोणगाव आहे. या गावातील शेतकरी आनंद शेटे यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करायचं ठरवलं आणि 3 एकरात कढीपत्त्याची लागवड केली. मागच्या सलग 10 वर्षापासून ते ही कढीपत्त्याची शेती करत आहेत.यातून वर्षाला त्यांची लाखोंची कमाई देखील होत आहे.
आनंद शेटे यांची हे 10 वर्षापासुन कढीपत्त्याची शेती करत आहे. वर्षातून तीन वेळा ते या कढीपत्त्याची छाटणी करतात. कढीपत्त्याची लागवड करण्याआधी जमिनीची खत टाकून मशागत करावी लागते त्यासोबतच ट्रॅक्टरच्या सहाय्याने नंगारनी करुन घ्यावी लागते. कढीपत्त्याची लागवड केल्यानंतर एका वर्षांनी त्याचे उत्पन्न सूरू होते.
आठ दिवसाला एकदा या कढीपत्त्यांचे पिकांवर फवारणी करावी लागते. यकमध्ये बुरशीनाशक,कीटकनाशक या औषधांची फवारणी करावी लागते.
3 एकर बागेत लावलेल्या कढीपत्त्याची छाटणी दर 4 महिन्याला शेतकरी आनंद शेटे हे करत आहे.दर छाटणीला या कढीपत्त्यांला वेगवेगळे दर मिळतात.कढीपत्त्यांला कधी 50 रुपये,40 रुपये,35 रुपये तर कढी 5 रुपाये किलो प्रमाणे दर मिळतो.
त्यामुळे शेटे यांना कढीपत्ताच्या विक्रीतून वर्षाला तीन ते चार लाख रुपयाचे उत्पन्न सहज मिळते.शेतकऱ्यांनी जर कडीपत्त्याची लागवड करावी एकदा कढीपत्ता लावला तर दहा वर्ष त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळते.
Leave a Reply