धनगर बांधवांनी विठ्ठल दर्शन घेऊन संभाजीनगरकडे केले प्रयाण…..
16 दिवसापासून सुरू असणारे धनगर उपोषण स्थगित केल्यानंतर आज सहा धनगर बांधवांनी विठ्ठल दर्शन घेऊन संभाजीनगरकडे प्रयाण केले. विठ्ठल मंदिराच्या संत नामदेव पायरी येथून विठ्ठलाचे दर्शन घेत सहा धनगर बांधव रुग्णवाहिकेतून संभाजीनगर कडे गेले. आज दुपारी दोन वाजता संभाजीनगर येथील जात पडताळणी कार्यालयास हे सहा उपोषण करते घेराव घालणार आहेत. धनगड जातीचे खिलारे कुटुंबाचे प्रमाणपत्र रद्द व्हावे. ही प्रमुख मागणी आता धनगरांची असणार आहे. यानंतर आज सायंकाळी सहा उपोषणकरते आणि राज्यातील प्रमुख धनगर नेत्यांची संभाजीनगर येथे बैठक होईल.
Leave a Reply