हा विजय महायुतीचा नसून ईव्हीएमचा आहे- विजय वडेट्टीवार
ऑन नाना पटोले राजीनामा
– मला आता प्रसार माध्यमातून माहिती मिळत आहे, या संदर्भात पटोले यांनी हायकमांडकडे नक्की काय भूमिका मांडली याची माहिती घेतो आहे
ऑन महायुतीचा विजय
– महाराष्ट्रात नवं सरकार पुन्हा शेतकरी, महागाई, बेरोजगारी वाढली यावर काय करते ते बघू, विरोधक म्हणून आम्ही भूमिका पार पाडू
– हे सरकार जनतेने निवडून दिले आहे का ? हा प्रश्न जनता टाहो फोडून विचारत आहे, त्याचं उत्तर मिळणं अपेक्षीत आहे
– 2014 मोदी लाट असताना 42 जागा काँग्रेस जिंकले, आता फक्त 16 जागा जिंकल्या, सरकार विरुद्ध जनमत असताना इतक्या कमी जागा असा प्रश्न जनता विचारत आहेत
– लाडकी बहीण नावाने 5 टक्के मतं फिरली असतील पण अजून काय घडले यावर अभ्यास आणि विचार करावा लागेल
– असे कसं झालं हा प्रश्न महाराष्ट्रात जनता विचारत आहे
– पुन्हा मागे जाण्याचा प्रश्न नाही, ज्यांना अपेक्षा नव्हती असे माणसं निवडून आली आहेत
– काही लहान राज्य देऊन मोठी राज्य घ्यायचे असे भाजपचे सुरू आहे
– हा विजय भाजप महायुतीचा नसून ईव्हीएमचा आहे
– कोण कितीही दावा केला तरी विजय ईव्हीएमचा असून ईव्हीएमला हार घालून विजय साजरा करावा
ऑन शेतकरी प्रश्न
– शेतकरी संकटात होता, सोयाबीन कापूस विकला जात नाही, पीक विमा मिळाला नाही, अवकाळी, अतिवृष्टी पैसे मिळाले नाहीत, महागाई वाढली असे प्रश्न असताना सरकार विरुद्ध राग असताना सुद्धा अशा प्रकारचा निकाल येतो तेव्हा लोकांसमोर प्रश्न निर्माण होतात त्याचे समाधान आणि उत्तर याची वाट बघू
ऑन पवारांचे आमदार अजित पवरांच्या संपर्कात
– आमदार कोणाचा संपर्कात राहू द्या, मोदी-शाह सांगितलं ते होईल, राजे बोलतील ते होईल, विरोधक ठेवायचा नाही यासाठी सगळं सुरू आहे
ऑन प्रदेशाध्यक्ष धुरा
– मला जी जबाबदारी दिली ती सांभाळून दाखवली, पक्षाचा निर्णय मान्य असेल
ऑन मविआ वाद
– शेवटच्या टप्प्यात महायुतीत तिन्ही पक्षात वाद होता, उलट महाविकास आघाडीत वाद नव्हता, एकत्र काम करत होतो
– आम्ही सामूहिक लढलो पण हा निकाल धक्कादायक आहे, निर्णय न पचण्या सारखा आहे
ऑन अशोक चव्हाण
– हा त्रास कोणी दिला, अशोक चव्हाण संयमी आहेत त्यांची बदला घेण्याची भूमिका कधीच नसते
हिंदी
– योगी यांना पंतप्रधान बनवलं पाहिजे, योगी जिथे जातात तिथं भाजप विजयी होते, मोदी जाते तिथं भाजप हरते
– भाजपला 132 जागा मिळेल यावर विश्वास नाही, जनता ओरडत आहे
Leave a Reply