सोलापुरात विमानसेवेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक
सोलापूर विमानसेवेचे वारंवार आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापुरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र आणि राज्य सरकार विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करीत ‘सांग सांग भोलानाथ सोलापुरात विमानसेवा सुरु होईल का ?, भोलानाथ सरकारला सुबुद्धी सुचल काय ?’ प्रतिकात्मक भोलानाथ आणून त्याला प्रश्न विचारत केंद्र आणि राज्य सरकारची खिल्ली उडविली आहे. तसेच सोलापूर विमानतळासमोर हवेत विमान आणि फुगे सोडून विमानसेवेचे उद्घाटन केले आहे. दरम्यान, येत्या महिनाभरात सोलापूरची विमानसेवा सुरु नाही झाली तर कोणत्याही व्हिआयपी माणसाचे विमान सोलापूर विमानतळावर उतरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
Leave a Reply