तीन साधू पुराच्या पाण्यात अडकले, पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील घटना
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी तीन साधू हे पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. भीमा नदीच्या पात्रात असणाऱ्या महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी हे साधू पोहोचले होते. त्या मंदिराला आता पाण्याने वेढा दिल्याने हे साधू पुरात अडकून पडले आहेत. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची टीम या साधूंना वाचवण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी रवाना झाली आहे. हे साधू गेल्या काही तासांपासून पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत.
Leave a Reply