Bigg News-सोलापूरला मिळणार दोन मंत्री.. डायरेक्ट देवेंद्र कोठेना…?

Bigg News-सोलापूरला मिळणार दोन मंत्री.. डायरेक्ट देवेंद्र कोठेना…?

सोलापूर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता कोण- कोण मंत्री होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सोलापूर जिल्हा हा या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त झाल्याचे पाहायला मिळाले.भारतीय जनता पार्टीचे तब्बल पाच आमदार जिल्ह्यात निवडून आले आहेत. सलग पाच वेळा आमदार होण्याचा मान विजयकुमार देशमुख यांनी मिळवला असून, त्यानंतर सलग तीन वेळा सुभाष देशमुख हे आमदार झाले आहेत आणि सलग दोन वेळा अक्कलकोटचे सचिन कल्याणशेट्टी आणि मंगळवेढ्याचे समाधान आवताडे ते आमदार झाले आहेत.

यापूर्वी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना मंत्रिपद मिळाले होते. आता या दोघांमध्ये भाजप कोणाला मंत्री करणार याची उत्सुकता आहे. दरम्यान मुंबईतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यात दोन मंत्री पदे मिळणार आहेत. एक कॅबिनेट आणि दुसरा राज्यमंत्री, त्यामुळे आता सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी या तिघांपैकी कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार याची उत्सुकता आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *