सोलापूर विजयपुर हायवे वरील जखमी अवस्थेत पडलेल्या हरिणास नांदणीच्या सरपंचाने दिले जीवदान…

सोलापूर विजयपुर हायवे वरील जखमी अवस्थेत पडलेल्या हरिणास नांदणीच्या सरपंचाने दिले जीवदान…

शनिवार दिनांक 2 6एप्रिल 2025 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सोलापूर च्या दिशेने विजयपुर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 नांदणी टोलनाक्याच्या समोर आणि भागवत पेट्रोल पंपासमोरे अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरिण जखमी अवस्थेत पडलेले होते.
नांदणी गावचे कर्तव्यदक्ष सरपंच शिवानंद बंडे आणि नांदणी गावचे सामाजिक कार्यकर्ते गणपती डोमनाळे हे दोघे जण नांदणी गावाकडुन आपल्या वैयक्तिक कामासाठी ते सोलापूरच्या दिशेने निघाले होते.
नांदणी टोलनाका गेल्यानंतर बरोबर भागवत पेट्रोल पंपा समोरच एक हरिण जखमी अवस्थेत बरोबर विजयपुर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 वर त्यांना आढळून आले.
त्यानंतर नांदणी गावचे सरपंच शिवानंद बंडे नांदणी गावचे सामाजिक कार्यकर्ते गणपती डोमनाळे यांनी आपली चारचाकी गाडी साईडला घेतली आणि त्या जखमी अवस्थेत पडलेल्या हरिणाकडे जाऊन पाहणी केली ते हरिण जखमी अवस्थेत असलेल्या चे त्यांच्या लक्षात आले
त्यांनी लगेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाईल वरून सर्व घटनेची माहिती दिली.
तसेच सरपंच शिवानंद बंडे यांनी मंद्रूप गावातील प्राणीमित्र साहिल शेख आणि आदित्य घाडगे यांनाही या घटनेची माहिती मोबाईल दिल्यानंतर ते ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्या जखमी हरिणाची अवस्था पाहून याला उपचाराची गरज असल्याची सरपंच शिवानंद बंडे यांना सांगितले लगेच सरपंच शिवानंद बंडे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने नांदणी टोलनाका येथील हायवे ॲम्बुलन्स च्या माध्यमातून जखमी हरिणास पुढील उपचारासाठी सोलापूरकडे पाठवण्यात आले.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *