मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-गोवा महामार्गाची केली पाहणी
मुंबई- गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज स्वतः मैदानात उतरले आहेत. या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. काहीही करून गणेशोत्सवपूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रेपीड क्विक सेटिंग हार्डनर ( एम -60 ) चा वापर करून हे खड्डे बुजवता येथील का याचाही आढावा ते घेत आहेत.
याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली आहे याचाही आढावा ते या दौऱ्यात घेणार आहेत. यावेळी खासदार श्रीरंग अप्पा बारणे,आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच एनएचएआय, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे,रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हेदेखील त्यांच्यासोबत उपस्थित आहेत.
Leave a Reply