जबरी चोरीच्या गुन्ह्यातील २ आरोपी जेरबंद; रेकॉर्डवरील आरोपीविरुद्ध खूनाचाही गुन्हा दाखल
सांगली पोलिसांकडील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे व त्यांच्या पथकानं सोमवारी, जबरी चोरीच्या गुन्ह्यातील दोघांना गजाआड केलंय. या आरोपींना गुन्ह्याच्या तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडं सोपविण्यात आलंय.
सागर सुरेश चौगुले (वय – ३३ वर्षे, राहणार जयभिम कट्टयाच्या पाठीमागे, इंदीरानगर, विश्रामबाग, सांगली) आणि सुखदेव संगाप्पा कांबळे (वय – ४२ वर्षे, रा. हनुमानगर, ५ वी गल्ली, विश्रामबाग, सांगली) अशी या आरोपीतांची नावं असून उभयतांविरूध्द, २५ ऑगस्ट रोजी रात्री विश्रामबाग पोलीसांकडं भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
गुन्हे अन्वेषण पथकाला मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, सोमवारी रचलेल्या सापळ्यात ते पोलिसांच्या हाती लागले. त्यातील सुखदेव कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल असल्याचंही सांगण्यात आलंय
Leave a Reply