शास्त्री नगर भागातील नागरिकांना पाणी, रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती, घंटागाडी, ड्रेनेज आदी मूलभूत सोयीसुविधा द्या अन्यथा महानगरपालिकेत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा वाहिद बिजापूरे यांचा इशारा

शास्त्री नगर भागातील नागरिकांना पाणी, रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती, घंटागाडी, ड्रेनेज आदी मूलभूत सोयीसुविधा द्या अन्यथा महानगरपालिकेत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा वाहिद बिजापूरे यांचा इशारा

 

चेतनभाऊ नरोटे, वाहिद बिजापूरे यांच्या नेतत्वाखाली मोर्चा काढून महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले.

तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की  प्रभाग १७ शास्त्रीनगर भागात होणारा अपुरा आणि गढूळ पाणी पुरवठा, रस्ते दुरुस्ती, दिवाबत्ती, ड्रेनेज, घंटागाडी आदी समस्यांकडे महानगर पालिका प्रशासनाचा दुर्लक्ष होत असल्यामुळे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापूरे व सरफराज काजी युवक काँग्रेसचे सोलापूर जिल्हा प्रभारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पुनम गेटवर मोर्चा काढून सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली उगले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मा. आयुक्तांनी यावर ताबडतोब उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *