सोलापूर विकास मंचने फुंकलं रणशिंग ! ५४ मिटर रस्ता खुला न झाल्यास ०२ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन
सोलापूर : सोलापूर विकास मंचने ५४ मीटर रस्त्याबाबत आक्रमक पवित्रा घेतलाय. हा रस्ता सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने खुला न झाल्यास, मंचच्यावतीनं ०२ ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचं रणशिंग फुंकलंय.
गुरुवारी, २२ ऑगस्ट रोजी सोलापूर महानगरपालिका, प्रभारी नगर अभियंता सारिका आकुलवार यांच्यासमवेत मंचच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली. अत्यंत महत्त्वाच्या ५४ मीटर रस्त्याच्या संदर्भात मंचच्या वतीनं सोलापूर महानगरपालिकेला वेळोवेळी भेटून तथा महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सुचित करण्यात आल्याची बाब यावेळी शिष्टमंडळानं त्यांच्या निदर्शनास आणून दिलीय.
५४ मीटर रस्त्याच्या मुद्यावर सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यासह अनेक वाणिज्यिक आणि सामाजिक संस्थांनी सोलापूर विकास मंचच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवलाय. सर्व अडथळ्यांची पूर्तता करून रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ०२ ऑक्टोबर रोजी सोलापूर विकास मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, इशारा यावेळी देण्यात आलाय.
ह्यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा, मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, विजय कुंदन जाधव, अॅड.दत्तात्रय अंबुरे, सारंग तारे, गणेश शिलेदार, प्रसन्न नाझरे, नरेंद्र भोसले, कैलास लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a Reply