बदलापूर येथे झालेल्या दोन चिमुरडीवर अत्याचार…….
बदलापूर येथे झालेल्या दोन चिमुरडीवर अत्याचार झाला होता.. त्यातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांच्या चकमकीत त्याचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.. या एन्काऊंटर वर सध्या राज्यभर अनेक पडसाद उमटत आहेत.. झालेला एन्काऊंटर योग्य की अयोग्य या प्रकरणावर तरुणांना काय वाटतं असे एक ना अनेक प्रश्न घेऊन लोकप्रधानाची टीम शहरातील प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.
आज सोलापूर शहरातील कस्तुरबाई एज्युकेशन अध्यापक विद्यालय येथे या प्रकरणावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला.. या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला.. विद्यालयातर्फे लोकप्रधान टीमचे स्वागत करण्यात आले.. हे चर्चासत्र यशस्वी करण्यासाठी अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अश्विन बोंदार्डे सर वाघमारे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Leave a Reply