आमदारद्वय आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी केली सोलापूर विमानतळाची पाहणी
केंद्र आणि राज्य शासनाचे मानले आभार
सोलापूर : प्रतिनिधी
माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख आणि माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सोलापूर विमानतळाची पाहणी केली.
याप्रसंगी भाजपाचे सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, सरचिटणीस विशाल गायकवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, माजी सभागृह नेते संजय कोळी, प्रसाद कुलकर्णी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
विमानतळाच्या कामाबाबत यावेळी समाधान व्यक्त करत आमदार आणि भाजपा पदाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले. सोलापूर विमानतळाचे टर्मिनल मॅनेजर वीरेंद्र ससी यांनी यावेळी आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांना विमानतळाच्या कामांची माहिती दिली.
Leave a Reply