सोलापूर मार्केट कमिटीवर दादागिरी?

सोलापूर मार्केट कमिटीवर दादागिरी?

सोलापूर मार्केट कमिटीवर दादागिरी?

सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या निकालाचा नारळ सोमवारी सकाळी 11 पर्यंत फुटणार असून क्रॉस व्होटींगचा फटका कुणाला याची उत्सुकता आहे. रविवारी 96.24 टक्के मतदारांनी मतदान केले, जवळपास सर्वच मतदारांना (दहा)हजारात गांधीबाबा पावले. त्यामुळे मार्केट कमिटीवर दादागिरी चालणार की…याचाही फैसला होणार आहे. निंबर्गी येथे मतदान केंद्रावर सुरेश हसापुरे आणि अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्यात खडाखडी झाल्याचे पाहायला मिळाले तर वडाळ्यात आजोबा आणि नातू यांच्यात चाय पे चर्चा झाल्याचे सुखद चित्रही दिसले.

आ.सचिन कल्याणशेट्टी आणि दिलीप माने यांच्या विकास पॅनलसमोर आ.सुभाष देशमुख यांचे परिवर्तन पॅनल अशी सरळ लढत कृउबासाठी झाली. रविवारी सर्वच मतदान केंद्रांवर चुरशीने मतदान झाले, त्यामुळे निकालही धक्कादायक लागतील, असा अंदाज आहे. 5431 पैकी 5227 मतदारांनी शेतकर्‍यांचे भले कोण करणार यासाठी निवडणूक़ चिन्हासमोर फुली मारली. सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायत सदस्य, यार्डातील व्यापारी आणि हमाल तोलार यांना मतदानाचा हक्क होता. निवडणुकीचे नेतृत्व भाजपाचे पण फायदा काँग्रेसचा अशी ही निवडणूक भाजपाईंना अस्वस्थ करणारी होती. त्यामुळे निकाल कसा लागतो याची उत्सुकता आहे

. निंबर्गी येथे सुरेश हसापुरे आणि अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांच्यात वाद झाला. तर तिकडे काका साठे (आजोबा) आणि मनीष देशमुख (नातू) यांचे एकत्रित चहापान झाले. आजपयर्र्ंत (साठे)मामा भाच्याला (बापू) साथ द्यायचे आता देखील शेलार मामा बनून पुढच्या पिढीसाठी ठामपणे उभे होते.

आ. कल्याणशेट्टी यांच्यासोबत युवा आ. देेवेंद्र कोठे यांचा दोस्ताना यानिमित्ताने अधोरेखित झाला. हे डबल दादा भाजपाच्या दोन देशमुखांशी हात करणार असाच संदेश होता. आज दिवसभर भाजपाचे दोन्ही दादा एकत्रितच होते. त्यांनी मतदान केंद्रांवर भेटी दिल्या. त्यांच्या उपस्थितीमुळे समस्त कार्यक़र्ते “दादा” आले म्हणून उत्साहीत होते. तर काही तरुण कार्यकर्ते मनीष भैयांसोबत होते. शिवदारे, नरोळे, अलगोंडा हे एकाकी दिसले. विभुते आणि कळके यांचा बोरामणीत तळ होता. संपूर्ण निवडणूक व आज मतदान प्रक्रियेवर आ.सुभाषबापू आणि दिलीप माने यांचे मायक्रो मॅनेजमेंट सक्रिय होते. माजी मंत्री म्हेत्रे यांच्या अस्तित्वाची लढाई असून त्यामुळे त्यांनीही भर उन्हात मतदान केंद्रांवर फेरफटका मारला.

भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश मळेवाडी (राजूर) यांनी पक्षाचे नेते कार्यकर्त्यांना गिनत नाहीत, म्हणून आपल्या मुलाला उमेश मळेवाडी यांना रिंगणात उतरविले. ग्रा.पं.आर्थिक दुर्बल घटक (संपूर्ण) मतदारसंघात मळेेवाडी यांची अ‍ॅटोरिक्षा प्रचारासाठी फिरली. आजदेखील सुरेश मळेवाडी आणि त्यांचा परिवार सर्व मतदान केंद्रांवर फिरताना पाहायला मिळाला. सामान्य कार्यकर्त्यांसाठी हे चित्र अस्वस्थ करणारे होते. कारण आता (भाजपा)पक्ष मोठा होतोय, (अन्य पक्षांचे इनकमिंग केवळ लाभार्थी) पण भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते…?

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *