बापरे! अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; ट्रेन पकडताना प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला, ओरडत राहिला पण… थरारक VIDEO समोर

बापरे! अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; ट्रेन पकडताना प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला, ओरडत राहिला पण… थरारक VIDEO समोर

रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो. त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वत:च्याच चुकीमुळे झालेले असतात. कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो, कधी दरवाजात उभे असताना तोल जातो. लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत. ‘अती घाई संकटात नेई, असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक धक्कादायक घटना व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे. अंबरनाथमध्ये प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये एका व्यक्ती अडकतो अन् त्यानंतर जे होतं त्याचा तुम्ही विचारही नाही करु शकत.
महाराष्ट्रातील अंबरनाथ रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी अपघात घडला ज्यामध्ये रोहित बच्छेलाल यादव नावाच्या ३४ वर्षीय व्यक्तीने चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना आपला जीव गमावला. मूळचा उल्हासनगरच्या लालचौकी भागातील रहिवासी असलेला रोहित नुकताच अंबरनाथला गेला होता. सकाळी ७:५१ वाजताची ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना त्याचा तोल गेला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमधील दरीत पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. सेंट्रल हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले तरी त्याला वाचवता आले नाही.अंबरनाथवरून सकाळी सीएसएमटीसाठी फास्ट लोकल रवाना होते. ही लोकल अंबरनाथच्या यार्डातून प्लॅटफॉर्म नंबर ३ वर येत असताना एक प्रवासी धावती लोकल पकडण्यासाठी धावला. मात्र, लोकलचा वेग अधिक असल्याने त्याचा तोल गेला आणि तरूण खाली पडला. तरूण धावती लोकल पकडताना प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला. यादरम्यान, लोकलचे २ ते ३ डबे त्याच्या अंगावरून पुढे गेले. त्यानंतर आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली आणि त्या प्रवाशाला वाचवण्याचा प्रयत्न केला. ही घटना स्पष्टपणे दाखवते की, चालत्या लोकलध्ये चढण्याचा धोका किती मोठा असू शकतो. केवळ जागेच्या घाईसाठी आपलं आणि इतरांचा आयुष्य धोक्यात घालणं किती घातक ठरू शकतं, याचं हे गंभीर उदाहरण आहे. या घटनेने त्याच्या कुटुंबाला धक्का बसला असून रेल्वे अधिकारी चौकशी करत आहेत. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कडक सुरक्षा उपाययोजना आखत आहेत.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *