तुळजाभवानी मंदिरातील मुस्लिम भाविकांना चौकशी करून सोडले

तुळजाभवानी मंदिरातील मुस्लिम भाविकांना चौकशी करून सोडले

तुळजापूर : दोन दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिर परिसरात संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मुस्लिम कुटुंबाला चौकशीनंतर सोडण्यात आले. कश्मीर मध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तुळजाभवानी मंदिर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले आहे.
या संदर्भात तुळजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मुस्लिम कुटुंब तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेले होते. तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सदर कुटुंबाला संशयित म्हणून चौकशीसाठी आणलेले होते. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर कोणताही घातपाताचा त्यांचा प्रयत्न नव्हता ते तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते. अशी माहिती प्राप्त झाल्यामुळे त्यांना चौकशीनंतर सोडून दिलेले आहे अशी माहिती मिळाली.याप्रकरणी सदर कुटुंब तुळजाभवानी मंदिर परिसरात अनेक वेळा दिसून आल्यामुळे संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. कश्मीर मध्ये झालेल्या हिंदू कुटुंबावरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मंदिराच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केलेली होती..
सदर मुस्लिम भाविक तुळजाभवानी विजय दर्शनासाठी आले होते ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील रहिवासी आहेत. मंगळवेढा पोलिसांकडे चौकशी केली असता हे मंगळवेढा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून त्यांना सोडून देण्यात आले आहे.
अण्णासाहेब मांजरे पोलीस निरीक्षक तुळजापूर

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *