मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना टार्गेट करू नये- राजेंद्र राऊत

मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांना टार्गेट करू नये- राजेंद्र राऊत

मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षापासून आंदोलन करत आहेत.मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण मिळावं अशी मागणी केली आहे.अशातच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली आहे.

आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, ”मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नये.राज्यात सहा प्रमुख पक्ष आहेत.सहापैकी तीन प्रमुख पक्ष सत्तेत आहेत.तर तीन विरोधात आहेत. विरोधात असलेल्या शरद पवार,उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात किंवा नाना पटोले यांनी लिहून द्यावं मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यासाठी आमची काही हरकत नाही. हा कागद घेऊन मी ताबडतोब देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो. आणि त्यांची देखील सही आणतो.असे विधान बार्शीचे अपक्ष आणि फडणवीसांचे खास असलेले आमदार राजेंद्र राऊत यांनी केले आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी जुलै महिन्यात मराठा आरक्षण आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली होती. राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी समजले जातात. राऊत यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेत उपोषणला बसू नये अशी विनंती राऊत यांनी केली होती.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *