विष्णू – महेश प्रतिष्ठानच्या वतीने एक एप्रिलला ‘एकता दौड
सोलापूर । माजी महापौर तथा जुना विडी घरकुलच्या विकासाचे प्रणेते स्व. महेश कोठे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून एकता दौड (मिनी मॅरेथॉन) चे आयोजन केले आहे. १ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता संभाजीराव शिंदे शाळा येथून या दौडला प्रारंभ होईल. स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संभाजीराव शिटे विट्या मंदिर येथे पोलिस आयुक्त एम राज कुमार यानी हिरवा झेंडा दाखल्यानंतर स्पाला सुरुवात होईल तिथून वैष्णवी मारुती चौक, प्रगती चौक, हिरा-मोती चौक, एच ग्रुप, पोशम्मा चौक, महालक्ष्मी चौक, सागर चौकमार्गे एसएस आयकॉन येथे त्याची सांगता होईल. सहभागी प्रत्येक स्पर्धकाला स्व. महेश कोठे यांच्या प्रतिमेचे टी-शर्ट व टोपी देण्यात येणार आहे. स्पोर्ट्स शूज मात्र स्थांकांनी स्वतः आणावयाचे आहे. ज्यांना पळण्याचा सराव आहे, कोणत्याही व्याधी नाहीत, हृदयविकार अथवा दमा नाही, अशांनाच स्पर्धेत भाग घेता येईल.
स्व. महेश कोठे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९२ मध्ये विडी घरकुलमधूनच झाली. याच भागातून निवडणुका लढवत ते महापालिकेवर निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी या संपूर्ण भागाचा कायापालट केला. हद्दवाढ भागातील विकासाचे एक रोलमॉडेल म्हणून विडी घरकुलकडे आज पाहण्यात येते, त्यामागे स्व. महेश कोठे यांची विकासाची दूरदृष्टी होती. जात, धर्म, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेद न ठेवता, स्व. कोठे यांनी विकास हाच एकसूत्री अंमल ठेवल्याने या भागाचा सर्वकष विकास दिसून येतो. त्यांच्या विचारांवरच घरकुलची एकी टिकून राहावी, या मुख्य हेतूनेच ही एकता दौड असल्याचे माजी नगरसेवक विठ्ठल कोटा यांनी सांगितले.
स्पर्धेत भाग घेण्यासाठी संपर्क :
विठ्ठल कोटा (९८६०६७०७०१)
आदि अन्नम (९८५०१६५९७१)
गिरीश कोटा (९३७०११११७८)
वासुदेव यलदंडी (९९७५१२५६७०)
Leave a Reply