श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांची पुण्यतिथी*उत्सव

श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांची पुण्यतिथी*उत्सव

३० मार्च २०२५ ते ६ एप्रिल २०२५ पर्यंत साजरी होणार सोलापूर दि.२९.०३.२०२५
पूर्व विभागातील श्री सुशीलम्मा मठ, कुचन नगर येथे श्री दिगंबर मुनीनाथ महाराजांची ४९ वी पुण्यतिथी महोत्सव, रविवार दि. ३०.०३.२०२५ पासून ते रविवार दि.०६.०४.२०२५ पर्यंत, विविध कार्यक्रमाद्वारे साजरा होणार असल्याची माहिती, उत्सव समितीचे अध्यक्ष विक्रम कारमपुरी व उपाध्यक्ष नागार्जुन कुसुरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री दिगंबर मुनीनाथ महाराज यांची ४९ वी पुण्यतिथी महोत्सव दि. ३० मार्च ते ०६ एप्रिल असे आठ दिवस सुशीलम्मा मठ, १६/१, कुचन नगर, येथे होणार असून, यात काकडा आरती, गीता पारायण, ज्ञानेश्वर पारायण, महापूजा मूर्ती प्रतिष्ठापना, श्रीमद् भगवद तेलुगु प्रवचन, गुरु सानिध्य तेलुगु प्रवचन, गुरु गीता विचारणा, हरिपाठ, हरीजागर, तेलुगु भजन, काल्याचे किर्तन व महाप्रसाद अशा सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमाद्वारे होणार आहे.
विष्णू कारमपुरी (महाराज), श्रीनिवास कुसुरकर (महाराज), श्रीनिवास चिलवेरी (अण्णा), यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या वरील कार्यक्रमास ह. भ. प. आनंद गुजर, ह. भ. प. विठ्ठल वल्लमदेशी महाराज, ह. भ. प. अंजय्या दुस्सा, ह. भ. प. सिद्राम पोला, ह. भ. प. मारुती जिंदम, ह. भ. प. नरसिंग बिरकुल,
ह. भ. प. कुमारस्वामी बिटला, श्री सत्यनारायण जोगु पंतलू, कुरापाटी महाराज, श्री कल्याणम व्यंकटदास भजनी मंडळ, श्री सिद्धारूढ भजनी मंडळ, संत कबीर भजनी मंडळ, ओंकार भजनी मंडळ, श्री श्रमजीवी, श्री भावनाऋषी भजनी मंडळ, श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळ, श्री राकेश अन्नम महाराज, आदी संत महात्म्यांचा सहभाग राहणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या पुण्यतिथी सप्ताह यशस्वी करण्यासाठी, श्री दिगंबर मुनिनाथ भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते भक्तगण विशेष परिश्रम घेणार आहेत.
तरी सर्व भाविक भक्तांनी, पुण्यतिथी महोत्सव सप्ताह कार्यक्रमात उपस्थित राहून, संत महात्म्यांच्या आचार, विचारांचा श्रवणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी केले आहे.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *