महापालिकेच्या परिवहनच्या महामंडळाने शहरात सुरु असलेल्या बससेवेत १ एप्रिल २०२५ पासून प्रवासी भाडेवाढ करण्यात येत आहे.

ही भाडेवाढ अल्प असून यामागे परिवहन उपक्रमाला उर्जितावस्था आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे परिवहन उपक्रम अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. तत्पूर्वी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांची मान्यता घेण्यात आली आहे. सोलापूर महापालिका आर्थिक सहाय्य रुपाने पूर्वी असलेल्या सेवा सुविधांबाबतचा मुंबई प्रांतिक महापालिका अधिनियम कलम ९५ अ नुसार सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रका समवेत विविध अहवाल सादर करण्यात आला आहे.
टप्याटप्यानुसार ही दरवाढ पाच रुपयाच्या तुलनेत असणार आहे. सन २०२५-२६ मध्ये परिवहन उपक्रमाचे ३० बसेस मार्गावर धावतील असे ग्राह्य धरून ६ कोटी ५३ लाख इतके उत्पन्न अपेक्षित आहे. यामध्ये सवलतीचे पासेस व रिझर्व बसेस तसेच इतर उत्पन्न धरण्यात आले आहे. बसेसवरील आंतरबाह्य जाहिरात, बस क्यू जाहिरात व बस क्यू शेडवरील जाहिरात यापासून वार्षिक ३३ लाख ४५ हजार रुपयांचे उत्पन्न गृहित धरण्यात आले आहे. किंचित करण्यात आलेल्या बस भाडे दरवाढ यामुळे प्रवाशांना अधिक आर्थिक तोटा बसणार नाही. वास्तविक परिवहन उपक्रमाला उत्पन्न ७ कोटी आणि खर्च ४० कोटी रुपयांच्या वर असल्याचेही सांगण्यात आले.
Leave a Reply