श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती झालेल्या मतमोजणी मध्ये सिद्धेश्वर शेतकरी पॅनल चे 11 उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडणूक आले.
उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावचे सुपुत्र अविनाश मार्तंडे हे सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यांनी आपल्या उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता.
रविवार दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी शांततेत मतदान झाले.
सोमवार दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी मतमोजणी कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवन श्री सिद्धेश्वर साखर कारखाना येथे 9 ते 3:00 वाजेपर्यंत अत्यंत संपन्न झाले
यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी माजी आमदार दिलीप माने दक्षिण सोलापूर चे नेते सुरेश हसापुरे यांनी एकत्रित येऊन श्री सिद्धेश्वर शेतकरी पॅनल ची निर्मिती केली होती
श्री सिद्धेश्वर शेतकरी पॅनल चे 11 पैकी11 उमेदवार विजयी झाल्यामुळे सोलापूर शहरासह ग्रामीण भागातुन कार्यकर्त्यांच्या वतीने मोठा जल्लोषात करण्यात आला.
यातच उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी गावचे सुपुत्र अविनाश मार्तंडे यांनी 1345 मताधिक्य घेऊन विजयी झाल्यामुळे मार्डी सह संपुर्ण उत्तर सोलापूर तालुक्यातुन आनंद साजरा केला जात आहे
कार्यकर्त्यांनी निवडणुकीचा निकाल लागल्यापासून मार्डी येथील घरासमोर मोठी गर्दी केली होती
अविनाश मार्तंडे यांची विजयी मिरवणूक संपूर्ण मार्डी गावातून कार्यकर्त्यांकडून काढण्यात आली. कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलाल उधळून पेढे वाटून रात्री उशीरापर्यंत आनंद उत्सव साजरा केला.
Leave a Reply