सोलापूरचा जयहिंद फुडबँक शाखा गुजरातच्या सुरत मध्ये देखील
जय हिंद फूड बँक शाखा सुरत या ठिकाणी जय हिंद फूड बँक आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान, अवयव दान व मेडिकल चेक अप, नेत्र रोग तपासणी महासेवा या उपक्रमात एकूण 471 जणांनी रक्तदान केले
161 जणांनी नेत्र तपासणी 140 जणांनी फुल बॉडी चेक अप 51 जणांनी अवयव दान नोंदणी केले
गुजरात मध्ये या कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळ्यास पुष्पहार घालून व दिपप्रज्वलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन सुरवात करण्यात आलेल्या हे कार्य.
जयहिंद फुडबँक शाखा सुरत च्या माध्यमातून दर गुरुवारी एक अनोखी मोहीम राबवली जाते या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या अवतीभवती परिसर पूर्ण स्वच्छ करून शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून छ. शिवाजी महाराजांची आरती केली जाते व तिथे त्यांना मानवंदना व मानाचा मुजरा सूरत शाखा च्या माध्यमातून दर गुरुवारी केला जातो.
जय हिंद फूट बँक सुरत शाखा च्या माध्यमातून 24 नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आला होता या मार्गदर्शन शिबिरामध्ये जयहिंद फुडबँकेचे संस्थापक सतिश सुरेश तमशेट्टी यांच्या उपस्थितीत हा शिबिर ठेवण्यात आला.
या उपक्रमात सुरत शहरातील व तसेच इतर शहरातील युवकां कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जयहिंद फुडबँक शाखा सुरत कडून दर गुरूवारी चालणाऱ्या मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मानवंदना करण्यात येत असते व तसेच या रक्तदान शिबिर निमित्त महाराजांच्या पुतळ्यास या पुष्पहार व पुजा संस्थेचे संस्थापक सतिश तमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रीराम चौक, संजय नगर, लिंबायात,सुरत.या ठिकाणी हा उपक्रम घेण्यात आला या वेळी गुजरात राज्य प्रमुख ऍड. जयेश चांदेकर यांच्या नेतृत्वाखाली, महिला सदस्य ऍड. वैभविबेन निमजे, अमिताबेन दलाल, श्वेताबेन झोडे, उपस्थित होते, उपक्रम घेण्यात आले तसेच जय हिंद फूड बँक शाखा सुरत सर्व पदाधिकारी भूमेशभाई दलाल, विनोदभाई बोकडे, शुभम भाई नीमजे, गंगाधर जुमडे, तरुण भाई निनावे, विनोद भाई धकाते, शालीक भाई झोडे, अरुण भाई मराठे, पंकज भाई झोडे, प्रकाश भाई दलाल,विपुल पुल्ली व कार्यकर्ते सह अनेक मित्र मंडळ उपस्थित.
Leave a Reply