मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद
आज जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारला व देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा शैलीत इशारा दिला आहे. याप्रसंगी त्यांनी म्हटले आहे की, सरकारने बरेच वेळेस आम्हाला धोके दिले. विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची कित्येक वेळेस शब्द देऊन फसवणूक केली. मात्र यावेळेस आम्ही आता फसणार नसून, सरकारने लवकरच ओबीसी व मराठा एकच आहेत व मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावून राज्यातील कोटी मराठा समाजाच्या तरुणांचे भले करावे. असे नाही झाल्यास २९ ऑगस्ट पासून मुंबई येथे आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
या प्रसंगी बोलतांना जरंगे पाटील म्हटले की, पुरावे सापडलेल्या समाज बांधवांना तात्काळ कुणबी प्रमानपत्र द्या,
मराठा आणि कुणबी एक याचा अध्यादेश काढा. ५८ लाख नोंदी सापडल्या व सगळ्या जाती धर्मांच्या मुलींना मोफत शिक्षण करा. शिक्षनात जाती वाद आणु नका. मराठा आरक्षण मुद्यावर दाखल सर्व केसेस मागे घ्या.
तसेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी म्हटले आहे की, मला जर मारुन टाकायचे असेल, तर फडणवीस यांनी मला मारून टाकावे. तरीही मी मुंबई येथे आमरण उपोषण करणारच आहे. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर सुद्धा जोरदार टीका केली आहे. कारण छगन भुजबळ यांनी आता या उतरत्या वयात स्वतःची वाटोळे करून घेऊ नये, छगन भुजबळ तुम्हाला फक्त दोन समाजातील निर्माण केले जाते व काळे केले जाते. असा टोला सुद्धा यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर लगावला आहे.
असेच कोणी कितीही लावा लावी करा, मात्र मी मराठा आणि ओबीसी समाज बांधवांमध्ये वाद होऊ देणार नाही. तसेच यावेळी त्यांनी मराठा व ओबीसी समाजाच्या आजी-माजी आमदार खासदारांना सुद्धा आवाहन केले आहे की, तुम्ही मराठा आरक्षणाच्या लढाईमध्ये आम्हाला साथ द्या. समाज नक्कीच तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल. नाहीतर तुम्हाला दारात सुद्धा येऊ देणार नाही. कारण ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यांनी तरी मराठा समाज बांधवांसाठी व आरक्षणासाठी काहीतरी केले. मात्र तुम्ही काहीच करत नसल्यामुळे समाज तुमच्यावर नाराज होईल. व याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील.
Leave a Reply