मानाचा कसबा गणपतीला २११ डझन हापूस आंब्याची आरास
अक्षय तृतीया निमित्त सोलापुरातील श्रीमंत मानाच्या कसबा गणपतीला २११ डझन हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे. सोलापूरच्या बाळीवेस, कसबातील शेतकऱ्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपतीला देवगड हापूस आंब्याची आरास करण्यात आली. हे आंबे भक्तांनी देवाच्या चरणी प्रसाद म्हणून आणून दिले आहेत, त्याचीच आरास करण्यात आली आहे. गणपती मूर्ती भोवती आंबे रचून सजावट करून त्यासमोर बैलगाडीतून शेतकरी परिवार आंबे वाहतूक करतोय. असा देखावा साकारण्यात आला. दरम्यान या आंब्यांचा आज प्रसाद म्हणून वाटप केला जाईल.
Leave a Reply