ठेकेदाराकडून टोकण पध्दत बंद करा आणि बांधकाम कामगार प्रत्यक्षात भांडी वाटप करा….
कामगार संघटनांची सहाय्यक कामगार आयुक्तांना निवेदन.
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगारांसाठी सुरू असलेला गृहवस्तु भांडी वाटप करताना ठेकेदार, दलाल हे मनमानी पध्दतीने कामगारांकडून पैसे घेऊन वाटप करीत आहेत. त्याचबरोबर संघटनांचा नावाने सत्ताधारी शिवसेना शिंदे गट, भाजपा, राष्ट्रवादी अजित पवार गट, या राजकीय पक्षांनी राजकीय बोगस बांधकाम कामगारांचे शिबीर घेऊन भांडी वाटप करीत आहेत. याला पायाबंध घालण्यासाठी टोकण पध्दत बंद करावी व कामगार आयुक्त यांच्या देखरेखीखाली कार्यालयातच टोकन वाटप करावी. अशा मागणीचे निवेदन पाच संघटनेच्या वतीने विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले.
महाराष्ट्र कामगार सेना, सह्याद्री कामगार संघटना बहुजन पॅत्थर सेना, संघर्ष कामगार संघटना व भ्रष्टाचार विरोधी संघटना अशा पाच कामगार संघटनांनी मिळून सोलापूरातील बांधकाम नोंदणीपासुन विविध योजनांचा लाभ मिळविण्यापर्यंत चाललेला कामकाजात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गरीब कामगारांची लुट होत आहे. सदर लुट थांबविण्यासाठी ठेकेदार, खाजगी दलाल, स्वयंघोषित संघटना, सत्ताधारी पक्षाचे भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट व इतर राजकीय पक्षांनी आपआपल्या कार्यालयात बोगस बांधकाम कामगारांचे शिबीर घेऊन बांधकाम साहित्य वाटप करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपल्या कार्यकर्त्यांना व महिलांना प्राधान्य देत आहेत. यावरून ही योजना पुर्णपणे फसवणुक व लुटमारचे आहे. सदर लुटमार व फसणुक थांबविण्यासाठी ताबडतोब भांडी वाटप व टोकन पध्दती बंद करावी. अशा मागणीचे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.
विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्यासह निवदेन देणाऱ्या शिष्टमंडळात बालाजी चराटे, गणेश बोड्डू, अंगद जाधव, सोहेल शेख यांचा समावेश आहे.
सदर निवेदनाचे प्रत माहितीत्सव मा. कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना पाठविण्यात आले.
Leave a Reply