बनावट सोन्याची नाणी पडली महाग; दहा लाख रोकड असणारी बॅग हिसकावून तोतया पोलीस पसार….
वडीलांची अचानक प्रकृती बिघडली आहे. पैशाची तातडीने गरज असून खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी अगदी कमी दरात विकायची आहेत, असे सांगून एका व्यवसायिकाला यवतमाळच्या आर्णी शहराबाहेर दिग्रस बायपास रोडवर बोलवले तो दहा लाख रोख घेऊन तिथे पोहोचला. मात्र
देवाणघेवाण सुरू असताना तोतया पोलिस दहा लाख रूपयांची रोख रक्कम घेऊन फरार झाले. याप्रकरणी चाक आरोपी निष्पन्न झाले आहे, त्यातील एका आरोपीला अटक केली असून चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत वापरण्यात आलेल्या वाहन मालकाला पोलीसांनी अटक केली असून बाळू जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. महेश रामेश्वर हाके राहणार शिरणाळ, जिल्हा लातूर असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे.
Leave a Reply