रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या वतीने एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर येथे पौगंडावस्था समुपदेशनाचा कार्यक्रम

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थच्या वतीने एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर येथे पौगंडावस्था समुपदेशनाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला . या कार्यक्रमाचे आयोजन कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्निल शेठ आणि श्रीमती शिबानी बॅनर्जी यांनी केले होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री शंकर सोनटक्के यांनी करून दिली या समुपदेशन सत्रात प्रमुख वक्ते डॉ. जान्हवी माखिजा, वंदना कोपकर, आणि श्री राहुल बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना पौगंडावस्थेतील भावनिक, मानसिक, आणि शारीरिक बदलांबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.


तज्ज्ञ समुपदेशकांनी विद्यार्थ्यांना तणाव व्यवस्थापन, सकारात्मक दृष्टिकोन, आणि योग्य निर्णयक्षमता विकसित करण्याच्या विविध बाबींवर मार्गदर्शन केले. या सत्रात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांना मिळालेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या जीवनातील या महत्त्वाच्या टप्प्यातील आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एमआयटी ज्युनिअर कॉलेज वाखरी पंढरपूर येथील सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *