54 मीटर रस्त्याबाबत महापालिका प्रशासन संवेदनशील आणि गंभीर.

54 मीटर रस्त्याबाबत महापालिका प्रशासन संवेदनशील आणि गंभीर.
………..अतिरिक्त आयुक्त व शहर अभियंता.

सोलापूर विकास मंच, प्रस्तावित 54 मीटर रस्ता ता तातडीने पूर्ण करण्यासाठी गेले तीन वर्ष प्रयत्न करत आहे.
शाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वेचा पूल, ज्याचे आयुर्मान संपलेले आहे तो पुल रेल्वे प्रशासन कधीही जमीन दोस्त करू शकते .अशा वेळेस सोलापूर शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवेल .
हा पूल पाडल्यानंतर पर्याय म्हणून पुणे नाका धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, अवंती नगर, अरविंद धाम, रेल्वे अंडर ब्रिज, देशमुख पाटील वस्ती , सीएनएस हॉस्पिटल ते सोरेगाव हा 54 मीटर रस्ता ता प्रस्तावित आहे .
या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासन अजिबात गंभीर नाही. रेल्वेचा पूल पाडल्यानंतर वाहतुकीची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल. या सर्व बाबी सोलापूर विकास मंचने महापालिका आयुक्त, शहर अभियंता, महापालिकेचे इतर अभियंते यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या.


रेल्वेचे डीआरएम साहेबांसोबत व त्यांच्या टेक्निकल टीम सोबत सुद्धा विकास मंचने दोन ते तीन मीटिंग घेतल्या.

सोलापूर विकास मंचने 2 ऑक्टोबर रोजी 54 मीटर रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
परिणामी अतिरिक्त आयुक्तांनी आज 30 सप्टेंबर रोजी सोलापूर विकास मंच सोबत तातडीची बैठक घेतली.
या बैठकीत सोलापूर विकास मंच कोअर कमिटी सदस्य, अतिरिक्त आयुक्त श्री संदीप कारंजे साहेब, शहर अभियंता श्रीमती सारिका अकुलवार व अभियंता प्रकाश दिवाणजी हे उपस्थित होते .
कारंजे साहेबांनी सांगितलं की या रस्त्याबाबत महापालिका प्रशासन अतिशय गंभीर आहे आणि रेल्वेचा पूल पाडल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीची सुद्धा त्यांना जाणीव आहे. रस्ता पूर्ण होण्यासाठी आणखीन काही निधीची गरज आहे,तो निधी आज महापालिकेकडे उपलब्ध नाही.
3 ऑक्टोबर रोजी माननीय पालकमंत्री सोलापुरात येत आहेत. त्यांच्यासमोर हा विषय मांडून 54 मिटर रस्त्यासाठी लागणारा अतिरिक्त निधी हा मंजूर करून घेणार आहेत.
यावेळेस सोलापूर विकास मंचचे काही सदस्यांना सुद्धा त्यांनी पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आमंत्रित केले आहे.
आज जवळपास एक तास चाललेल्या चर्चेत हे लक्षात आले की महापालिका प्रशासन 54 मीटर रस्त्यासाठी वेगाने काम करु इच्छिते ,निधीची कमतरता आहे.
एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सोलापूर विकास मंचने 2 ऑक्टोबर रोजी चे आंदोलन काही काळासाठी संस्थगीत केलेले आहे.अशी माहिती आज सदर शिष्टमंडळ मध्ये सहभागी झालेल्या मिलिंद भोसले, योगीन गुर्जर, केतन शहा, विजय जाधव, दत्तात्रेय अंबुरे,सुहास भोसले, आंनद पाटील या सोलापूर विकास मंच च्या सदस्यांनी प्रसार माध्यमे यांना ही माहिती दिली

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *