कल्याणमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी; दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पठण

कल्याणमध्ये रमजान ईद उत्साहात साजरी; दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पठण

आज रमजान ईदचा शुभ दिवस असून, कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत नमाज पठण केले आणि एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजानच्या पवित्र महिन्यात उपवास केल्यानंतर आजच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कल्याणमध्ये रमजान ईदचा उत्साह मोठ्या जल्लोषात पाहायला मिळत आहे. आज सकाळपासूनच दुर्गाडी किल्ला परिसरात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले आणि सामूहिक नमाज पठण केले. नमाजनंतर नागरिकांनी गळाभेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्यात रोजा ठेवत उपवास केल्यानंतर ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कल्याण परिसरातही विविध ठिकाणी विशेष नमाज पठण आणि सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. दरम्यान, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांकडून विशेष गस्त घालण्यात येत असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली आहे. कल्याणकर नागरिकांसाठी आजचा दिवस आनंदाचा असून, शांततेत आणि उत्साहात रमजान ईद साजरी केली जात आहे.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *