उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील संत श्रेष्ठ बाळु मामांच्या मंदिर भंडारा महोत्सव कार्यक्रम संपन्न.
उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील संत श्रेष्ठ बाळु मामांच्या मंदिरात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर 24मार्च 2025पासुन ते 30 मार्च 2025रोजी या सप्ताहामध्ये संत श्रेष्ठ बाळु मामांच्या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या मध्ये भजन धनगरी ओव्या, भारूड आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताह सुरुवात झाल्यापासून ते आज गुढीपाडवा च्या आजच्या दिवसा पर्यंत बाळु मामांच्या मंदिरात भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थित होती.
आज गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे पासून भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
या सप्ताहामध्ये आजच्या दिवशी हभप अभिमान महाराज घंटे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्तहाची सांगता झाली.
या वेळेस काल्याच्या कीर्तना संबंधी उपस्थित असलेले हभप अभिमान महाराज घंटे आणि संत श्रेष्ठ बाळु मामा ट्रस्ट चे अध्यक्ष श्रीराम बापु पाटील यांनी अधिक माहिती लोकप्रधान न्युज चॅनल शी बोलताना दिली.
हा संपूर्ण सप्ताह यशस्वी होण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांसह ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
Leave a Reply