एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये समाजातील प्रतिष्ठितांनीच केला गैरकारभार- डॉ. आडके

एन एम वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये समाजातील प्रतिष्ठितांनीच केला गैरकारभार- डॉ. आडके

गेली पंधरा वर्षे बंद असलेल्या हॉस्पिटलमध्ये चक्क धर्मादायच्या आशीर्वादाने गैरप्रकार.
गैरकारभाराची चौकशी सुरू होताच फक्त शिरीष गोडबोले उपस्थित, अध्यक्ष प्रभाकर करंदीकर व उपाध्यक्ष प्रेम रतन दमाणी पडले आजारी.

सोलापूर: सोलापूर व परिसरातील गरीब ,गरजू रुग्णांना दर्जेदार रुग्णाच्या मिळण्यासाठी 1934 साली डॉ. विष्णू गणेश वैशंपायन यांनी वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल ,सोलापूर ची स्थापना करून हॉस्पिटल सुरू केले . हॉस्पिटलच्या जागा, बांधकाम व यंत्रसामग्री अनेक दानशूर व्यक्तींनी तसेच समाजसेवी संस्थांनी देऊन २५० खाटांचे अतिशय अद्यावत रुग्णालय २००६ सालापर्यंत आपल्या सर्व विभागांमध्ये उच्च प्रतीची व माफक दरात वैद्यकीय सेवा देत होते परंतु हॉस्पिटल ट्रस्टच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचार , गैरकारभार व अंतर्गत वादामुळे २००६ सालापासून डॉक्टर व कर्मचाऱ्यांना पगार न देणे व अकार्यक्षम कार्यकारी मंडळाच्या कारभारामुळे २००९ सालापासून हॉस्पिटल पूर्णपणे बंद झाले. त्यामध्ये येथील असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या, गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणे बंद झाले व डॉक्टरांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम, जी एन एम नर्सिंग कोर्सेस बंद झाले. सोलापुरातील सर्वप्रथम असलेल्या एमआरआय, सिटी स्कॅन, कार्डियाक व न्युरो सर्जरी युनिट्स व इतर ऑपरेशन थिएटर्स ,सुसज्ज आयसीयूज , एक्स-रे, सोनोग्राफी, लॅबोरेटरी आयपीडी व ओपीडी विभाग, मेडिकल स्टोअर ,बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा व कॅन्टीन अशा कोट्यावधी रुपयाच्या मशिनरी व मालमत्ता या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. वरील हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये येथे काम करणाऱ्या डॉक्टर्स व स्टाफ ने सेवाभावी वृत्तीने या रुग्णालयाची उभारणी केली व विस्तारीकरण केले 2006 मध्ये तत्कालीन कार्यरत असलेले सचिव स्वर्गीय आर आर राठी यांनी हॉस्पिटलमध्ये बरेच सामग्री व फर्निचर तसेच गैरव्यवहार करून हॉस्पिटलच्या अतोनात नुकसान केले. परंतु तत्कालीन व आज पर्यंत कार्यरत असलेले अध्यक्ष प्रभाकर दत्तात्रय करंदीकर व त्यांच्या अकार्यक्षम कार्यकारी मंडळांनी त्यांच्या असंवेदनशील व भ्रष्ट कारभारामुळे या हॉस्पिटलचे अपरिमित नुकसान केले आहे.
दरवर्षी पाच लाखाच्या वर या हॉस्पिटल मध्ये खर्च होताना त्याच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये दिसत आहे, तसेच हॉस्पिटलने बंद स्थितीत असताना सुद्धा गेल्या पंधरा वर्षात दरवर्षी देणग्या, सरकारी सवलती, फंड जमा केलेले आहेत. कोविड काळामध्ये सुमारे द
२ कोटी ४७ लाख इतकी रक्कम या हॉस्पिटल वर खर्च केलेली आहे. परंतु एकाही रुग्णावर यामध्ये उपचार झालेले नाहीत .याबाबत धर्मादाय उपायुक्त सोलापूर तसेच धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समिती यांच्याकडे हॉस्पिटलमध्ये पूर्वी कार्यरत असलेले अस्थिरोग तज्ञ, डॉ. संदीप आडके यांनी दि.१०/०३/२०२५ रोजी पुराव्यानिशी लेखी तक्रार दिलेली आहे. परंतु या तक्रारीच्या सुनावणीस सचिव शिरीष गोडबोले हेच फक्त उपस्थित होते व अध्यक्ष प्रभाकर दत्तात्रय करंदीकर व उपाध्यक्ष प्रेम रतन दमाणी हे आजारी असल्यामुळे न आल्याचे सांगण्यात आले.

पंधरा वर्षात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून सोलापुरातील अद्ययावत हॉस्पिटल बंद पाडणाऱ्या ट्रस्टीज सुनावणीस येत नाहीत ही बाब अतिशय गंभीर असल्याची पुन्हा तक्रार डॉक्टर संदीप धर्मादाय उपायुक्त श्री प्रवीण कुंभोजकर यांच्याकडे दि.२९/०५/२०२५ रोजी केली आहे.
या हॉस्पिटलमध्ये सुरू झालेल्या सर्व गैर कारभाराबाबत २००६ सालापासून अनेक तक्रारी केल्या गेल्या होत्या .२००६ सप्टेंबर मध्ये नियमित पगार न देणे या कारणास्तव येथील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यावेळेस येथील कार्यरत असलेले सर्व ट्रस्टीज राजीनामे देऊन पळून गेलेले होते. अशा परिस्थितीमध्ये तेथे अस्थिरोग म्हणून काम करणारे डॉ.संदीप आडके यांनी अंदाजे एक महिना हे संपूर्ण हॉस्पिटल एक हाती चालवलेले होते. तसेच हॉस्पिटलचा ७३ वा वर्धापन दिन त्यांनी आपल्या आडके फाउंडेशनच्या मदतीने व स्वखर्चाने पार पाडला होता. तेव्हापासून आजपर्यंत वारंवार मागणी करून येथील डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या थकीत पैसे या हॉस्पिटलने त्यांच्याकडे लाखो रुपये ठेवी उपलब्ध असताना आजपर्यंत दिलेल्या नाहीत. ट्रस्ट प्रशासनाने दरवर्षी नियमाप्रमाणे मीटिंग घेणे ऑडिट रिपोर्ट न देणे पीटीआर वर नोंदणी न करणे मालमत्तेचे भ्रष्टाचार करून विक्री करणे नियमबाह्य पद्धतीने असे अनेक गैरव्यवहार २००६ सालापासून आज पर्यंत केलेले आहेत.
पुण्याचे प्रभाकर दत्तात्रय करंदीकर हे २००६ साली संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून आले परंतु ते आयएएस अधिकारी असून प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी शासनाची कोणतेही परवानगी घेतली नाही. संस्थेचे अध्यक्ष हे डॉक्टर असणे गरजेचे आहे .त्यांची नेमणूक ही नियमबाह्य आहे. स्वतः आयएस असताना सुद्धा त्यांनी इतक्या मोठ्या हॉस्पिटलचे प्रशासन अतिशय बेजबाबदार पणे सांभाळणे हे अनेक गोष्टीतून स्पष्ट होते. त्यांना स्वतःलाच या हॉस्पिटलमध्ये प्रवेश प्रतिबंधित होता व त्यांना हॉस्पिटलमध्ये इन्स्पेक्शन दरम्यान पैसे देऊन पोलीस प्रोटेक्शन घेऊन यावे लागले आहे तसेच त्यांनी लेखी पत्र लिहून येतील पोलीस आयुक्तांना हॉस्पिटलमध्ये कोणीही कर्मचारी अथवा वाचमन नसल्याने येथे चोऱ्या होतात म्हणून आपल्या पोलिसांना हॉस्पिटल वर नजर ठेवावी असेच लिहून दिलेले होते.
उपाध्यक्ष प्रेम रतन दमाणी सोलापूरचे असताना सुद्धा त्यांनी हॉस्पिटल कडे अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे.
पुढे संस्थेतील अंतर्गत वादामुळे चौकशी होऊन सहाय्यक धर्मादाय आयुक्त, सोलापूर यांनी २०१४ मध्ये संस्थेतील सर्व ट्रस्टीज व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ला दोशी धरून त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई प्रस्तावित केलेली होती परंतु यामध्ये दि.३१/०५/२०१८ रोजी माननीय जॉईंट चॅरिटी कमिशनर ,पुणे यांच्या आदेशाप्रमाणे तत्कालीन सचिव आर आर टी यांना ४१/ड कलमान्वये काढून टाकून तेथे पुण्यात वास्तव्यास असलेल्या शिरीष गोडबोले, डॉ. अनंत भागवत व अनिल बर्वे यांची फिट व प्रॉपर पर्सन म्हणून पुढील आदेशापर्यंत करंदीकर व दमाने यांना सहकार्य करण्यासाठी नेमणूक केलेली असता दोनच महिन्यामध्ये या तिघांनाही ट्रस्टी म्हणून कार्यकारी मंडळात घेण्यात आले व शिरीष गोडबोले यांची मानद सचिव म्हणून २५/०७/२०१८ रोजी नियुक्ती करण्यात आली. त्यापुढे या सर्वांनी संस्थेची कोणतेही संबंध नसलेले तसेच संस्थेच्या सर्व नियमांना डावलून अनेक लोकांना समाविष्ट करून घेतले .त्यामध्ये व्यापारी, पूर्वीच्या विश्वस्तांची नातेवाईक व स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले अनेक मंडळी आहेत.
शिरीष गोडबोले हे व्यवसायाने बिल्डर असून कारवाईदरम्यान काढून टाकलेल्या पूर्वीचे विश्वस्त डॉ. आर इ गोडबोले यांचे चिरंजीव आहेत. तसेच इतर दोघांचे सोलापूर अथवा या संस्थेची कोणतेही संबंध नाहीत.
या फिट पर्सनचे नियमबाह्य पद्धतीने फिट व प्रॉपर पर्सन व पुढे ट्रस्टी म्हणून नेमणूक करून घेणे, रुग्णालयाच्या इमारतींचे पाडकाम विनापरवाना करून लाखो रुपयांचा अपहार करणे, हॉस्पिटलच्या सर्वसामानाचे व्हॅल्युएशन अतिशय कमी दाखवून तातडीने हे सामान भंगार मध्ये विकण्याची
परवानगी घेणे व त्यासाठी या संस्थेचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य म्हणून असलेले एडव्होकेट नितीन विष्णू हबीब यांनीच एडव्होकेट अॅक्ट चे उल्लंघन करून या सर्व केसेस चालवलेल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांची सनद रद्द होऊ शकते.
डॉ. सुनील महावीर मेहता हे पूर्वीचे दोषी विश्वस्त डॉ.महावीर मेहता यांच्या चिरंजीव आहेत व हॉस्पिटल अडचणीत आल्यानंतर हॉस्पिटल मधून आपली सेवा बंद करून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. यातून येथे घराणेशाही चालू आहे हे सिद्ध होते.
दुंदरापू राम रेड्डी हे उद्योजक असून त्यांनी आपल्या बालाजी अमाईन्स उद्योगातून हॉस्पिटल साठी सीएसआर फंडातून पैसे देऊन नैतिकतेविरुद्ध कृती केलेली आहे तसेच त्यांच्यावर मा. उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकामाबाबत पंचवीस लाख रुपयांचा दंड ठेवलेला आहे त्यामुळे त्यांना संस्थेमध्ये राहण्याचा नैतिक अधिकार नाही.
संस्थेच्या सर्व जाहिराती झवेरी एडवर्टाइजरचे कल्पेश झवेरी हे करतात. संस्थेच्या नियमानुसार संस्थेच्या कुठल्याही सदस्याला आपल्या फायद्याच्या गोष्टी या संस्थेमध्ये करता येत नाहीत.

२०२२ मध्ये हॉस्पिटलच्या अनेक इमारतींचे पाडकाम नियमबाह्य पद्धतीने करून पैसे लाटलेले आहेत व २०२४ मध्ये करोडो रुपयाचे महागडे यंत्रसामग्री अक्षरशः पाच लाखांमध्ये भंगारामध्ये विक्री केलेली आहे. या सर्व अनियमित गोष्टी धर्मादाय आयुक्त कार्यालय, सोलापूर व पुणे यांच्या आशीर्वादाने झालेले आहेत.
एक अत्यंत अग्रगण्य व सुप्रसिद्ध असलेले हॉस्पिटल केवळ अकार्यक्षम भ्रष्ट कार्यकारी मंडळाने मातीमोल केलेले आहे व सोलापूर सह महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश येथील गरजू रुग्णांची वैद्यकीय सेवा मिळण्यापासून दूर ठेवण्याचे पाप केलेले आहे.
त्यापुढे आता सविता लळीत या बोर्ड ऑफ मॅनेजमेंट तर्फे सोशल मीडियावर आवाहन करून या हॉस्पिटलच्या पुन्हा बांधणीसाठी लोकांना भावनिक करून लाखो रुपयांचे देणग्या लुटण्याचे काम करीत आहेत.
त्यामुळे तात्काळ माझ्या तक्रारींवर धर्मादाय आयुक्त तसेच सोलापूर जिल्हाधिकारी ,धर्मादाय रुग्णालय जिल्हास्तरीय समिती व मुख्यमंत्री यांनी तात्काळ चौकशी करून सध्याच्या ट्रस्टीज व कार्यकारी मंडळास काम करण्यापासून परारुत्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई व झालेल्या नुकसानाची भरपाई करून घ्यावी. तसेच त्यांच्यावर फौजदारी केसेस दाखल कराव्यात .हे रुग्णालय ताबडतोब एखाद्या सक्षम धर्मादाय संस्थेत चालवण्यासाठी द्यावे अथवा सरकारने स्वतः ताब्यात घेऊन ते चालवावे जेणेकरून येथील गरीब व गरजू रुग्णांना पुन्हा याची रुग्णसेवा मिळून हे रुग्णालय नावारूपास येईल.
या कामासाठी हॉस्पिटल वाडिया हॉस्पिटल मध्ये पूर्वी कार्यरत असलेल्या व यासंबंधी आपुलकी असणाऱ्यांनी माझ्याशी 9822807007 येथे संपर्क साधावा असेही आवाहन डॉ. संदीप आडके यांनी केलेले आहे.

 

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *