५५ वा सिटू चा वर्धापन दिन साजरा ९ जुलै रोजी चा देशव्यापी सार्वत्रिक संप यशस्वी करा. – कॉ आडम मास्तर
सोलापूर दिनांक – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 फेब्रुवारी 2014 रोजी नवी दिल्लीतील सिरी फोर्ट ऑडिटोरियम येथे Confederation of All India Traders (CAIT) च्या सभेत व्यापाऱ्यांच्या धाडसाबाबत एक विधान केले होते. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्या भाषणात मोदी म्हणाले होते:
> “More than our soldiers, it is our traders who are known for their risk-taking capacity.”
या विधानाचा अर्थ असा होता की व्यापारी आर्थिक जोखमी स्वीकारून व्यवसाय करतात, ज्यासाठी धाडस आवश्यक असते. मात्र त्यांनी सैनिकांच्या धाडसाची तुलना व्यापाऱ्यांशी केली आहे. हा सैनिकांचा अक्षम्य अपमान होता.अर्थातच हे सरकार भांडवल धार्जिणे सरकार आहे. हे या देशातील श्रमिक कष्टकरी जनतेला न्याय देऊ शकत नाही अशी परखड टीका करताना जनता व देश विरोधी धोरणे अंमलात आणू पाहणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात ९ जुलै रोजी सार्वत्रिक देशव्यापी संपाची हाक देण्यात आली तो संप यशस्वी करण्या करिता लढ्याच्या मैदानात उतरा असे आवाहन ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर यांनी सिटू च्या ५५ व्या वर्धापनी केले.
शुक्रवारी सिटू चे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे ३० मे सिटू च्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ नरसय्या आडम मास्तर व सीटू चे राज्य महासचिव ॲड एम एच शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सर्व कार्यकर्ते जगातील कामगारांनो एक व्हा, कामगार एकजुटीचा विजय असो, सिटू वर्धापन चिरायू हो, सर्व कामगारांना किमान वेतन व पेन्शन लागू, सामाजिक सुरक्षा लागू करा, कामगार कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा, चार श्रम संहिता रद्द करा, जन सुरक्षा विधेयक मागे घ्या अशा गगनभेदी आवाजात जोरदार घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडले.
यावेळी सिटू चे राज्य महासचिव ॲड एम एच शेख यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, जर आपण ९ जुलै रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपात ताकदीने सामील नाही झाल्यास कोणत्याही परिस्थितीत सरकार कामगार विरोधी धोरणे अंमलात आणेल हा गंभीर धोका लक्षात घेऊन संप यशस्वी करूया त्यासाठी आजपासून तयारी करा.
यावेळी मंचावर कॉ युसुफ शेख मेजर, कॉ .कामिनी आडम, कॉ.नलिनीताई कलबुर्गी , नसीमा शेख कॉ.म.हनीफ सातखेड, कॉ.रंगप्पा मरेड्डी, कॉ.व्यंकटेश कोंगारी, कॉ .ॲड अनिल वासम कॉ.दीपक निकंबे आदींची उपस्थिती होती.
यावेळी सिटू संलग्न सर्व युनियन्स चे पदाधिकारी व सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply