बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेला मंत्री डॉ. गावित यांची भेट
तालुक्यातील आश्रम शाळेत शौचालयासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली. आज मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी लोय आश्रम शाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित, भाजपा राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉ हिना गावित, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र माळी तसेच वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. विजयकुमार गावित यांनी आश्रम शाळेतील सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात. बिबट्याचा तसेच हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवाराला शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडायला नको यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना डॉ गावित यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Leave a Reply