छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता राजकोट येथील घटनेत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादीची मागणी
राष्ट्रवादीकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काळे फित बांधून मूक निषेध आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट सिंधुदुर्ग येथील पुतळा निकृष्ट दर्जाचे काम आणि हलगर्जीपणामुळे कोसळला त्यामध्ये या प्रकरणात संबंधित अधिकारी इंजिनीयर आणि मूर्तिकार या सर्वांचीच सकल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर च्या वतीने मागणी करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली
राजकोट मधील घटनेचा निषेध करण्यासाठी मूक निषेध आंदोलन करण्यात आलं. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर काळ्याफिती बांधून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला . याप्रसंगी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जय घोष केला नंतर सर्व कार्यकर्त्यांनी स्तब्ध बसून मुक आंदोलन केले .
आंदोलनाप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार यांनी या घटनेमध्ये जे कोण दोषी असेल ते सर्व अधिकारी प्रशासन मूर्तिकार अभियंते जे कोण असतील त्या सर्वांवर चौकशी लावून त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना शासन झालं पाहिजे जेणेकरून पुढील काळात महाराष्ट्राची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बाबत उभारण्याचे काम करत असताना हलगर्जीपणा करणार नाहीत किंवा अशा पद्धतीची परत चूक होऊ नये याच करिता कडक शासन होणे आवश्यक आहे त्यामुळे आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली..याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान बिजू प्रधाने आनंद मुस्तारे सुभाष डांगे सुरेश तोडकरी यांसह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..
Leave a Reply