संत सेना महाराज समाधी सोहळा मोठ्या भक्तिभावात संपन्न
महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा हत्तुरे नगर च्या वतीने लिं.सौ. सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवनात संत सेना महाराजांची पुण्यतिथी समाधी सोहळा कीर्तनाने मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे व नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग चौधरी सर,अध्यक्ष मल्लिकार्जुन राऊत व आयोजक रामलू कोंडुर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात कीर्तनाने करून सकाळी 12:00 वाजता गुलाल उधळून अभिवादन करण्यात आले.
‘सेवाधर्म हेच खरे कर्म’ आपल्या अभंगातून सर्वांना सेवाभावाची शिकवण देणारे संत आहेत असे प्रतिपादन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केले.
ह.भ.प.मन्मथ बहिरमल महाराज यांनी आपल्या कीर्तनात संत सेना महाराज – विठ्ठलाचे निःसीम भक्त. मध्यप्रदेशातील बांधवगडमध्ये जन्मलेल्या सेना महाराजांचा मूळ व्यवसाय नाभिकाचा. आपले कर्तव्य पार पाडताना सेना महाराजांचे मन देवपूजेत रमलेले असायचे. सेना महाराजांनी हजारो अभंगाची निर्मिती करून सैनपंथ नावाची चळवळ भारतात सुरु केली. हीच चळवळ आज महाराष्ट्रात वारकरी म्हणून प्रसिद्ध आहे. पंढरपूरात त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. त्यांनी अनेक मराठी अभंग रचले. समतेची शिकवण संपूर्ण भारतात पसरावी या हेतूने ते संपूर्ण भारतात फिरले. पंजाबमध्ये असतांना त्यांनी पंजाबी भाषेत अनेक दोहे रचले. आजही संत सेना महाराजांचे अभंग मोठ्या आवडीने गायले जात जातात. अशा या महान संत सेना महाराजांची आज समाधी सोहळा साजरा करण्याचे भाग्य मला मिळाले असे ते म्हणाले. वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामलू कोंडूर,अध्यक्ष मल्लिकार्जुन राऊत,शोभा राऊत, अलका ताटे अमोघसिद्ध राऊत,सुनीता दळवी, शिलसिद्ध राऊत धोंडीराम वाघमारे, प्रभाकर राऊत,संतोष राऊत,नागराज कोंडू, श्रीशैल हडपद,नागेश कोरे , समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply