राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा शहर भाजपने आंदोलन करून शोक व्यक्त केला.

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा शहर भाजपने आंदोलन करून शोक व्यक्त केला.

मालवण मधील राजकोट
किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी या सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे दरम्यान याबाबत शहर भाजपने रविवारी भर पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं,यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करताना पुतळा कोसळण्यासाठी कारणीभूत असलेल्या लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.


यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले पुतळा पडला म्हणून आम्ही येथे शोक व्यक्त करत असून दोषींवर कारवाई व्हावी ही आमची प्रमुख मागणी आहे परंतु विरोधक या प्रकरणाला वेगळे वळण देऊन राजकारण करत असून महाराष्ट्रात अशांतता माजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अफजलखानाच्या उरुसाला विरोध न करणारे विशाल गडाच्या अतिक्रमणावर न बोलणाऱ्यांनी आम्हाला शिवभक्ती शिकू नये या अशा संवेदनशील प्रकरणावर राजकारण करता एकत्रित आलं पाहिजे असं ते म्हणाले
या आंदोलनात राजकुमार पाटील ,विशाल गायकवाड, श्रीकांत घाडगे ,विजया वड्डेपल्ली,इंदिरा कुडक्याल , मंजुषा मुंडके जय साळुंखे, राम मुटकीरी, श्रीनिवास करली यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *