भर पावसात होम मैदान येथे बड्या पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा ; काय घडलं ?
सोलापूर शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर होम मैदान येथे पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या परिसराची पाहणी आज करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोलापुरात आठ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबर रोजी त्यांचा हा दौरा असून शहरातील होम मैदान येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तसेच विविध शासकीय योजनेची माहिती देणार आहेत आणि जनतेला मार्गदर्शन करणार आहेत..
सध्या शहरात गेल्या दोन-तीन दिवसापासून मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रकारे अडथळा न येण्याची दक्षता आतापासूनच पोलिसांच्या वतीने घेण्यात येत आहे..
यावेळी पोलीस उपायुक्त कबाडे , पोलीस उपयुक्त दिपाली काळे सह अन्य अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Leave a Reply