राष्ट्रपतींनी घेतले कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचे दर्शन
कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अंबाबाई मंदिराला भेट दिली आहे. यावेळी राष्ट्रपतींनी देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन एकारती, पंचारती व कर्पुरआरती केली. देवीचे दर्शन घेतेवेळी राष्ट्रपतींसोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले.
दर्शनानंतर त्यांनी मंदिराविषयी आणि मंदिरातील किरणोत्सव सोहळा विषयी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून माहिती घेतली
Leave a Reply