ठाणे दिवा कोकण रेल्वे गर्दी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या मुंबई ठाण्यातील चाकरमान्यांची मोठी गर्दी दिवा रेल्वे स्थानकात झालेली पाहायला मिळतेय. सकाळी 6:20 ची दिवा सावंतवाडी एक्सप्रेस कोकणवासियांनी खचाखच भरलेली पाहायला मिळतेय. ट्रेनमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी यासाठी काल रात्री पासून कोकणवासीय दिवा रेल्वे स्थानकात होते मात्र तरीही बसण्यासाठी जागा मिळाली नसल्याने प्रवाशांना उभ राहून प्रवास करावा लागतोय. दरवर्षी कोकणात जाण्यासाठी जादा गाड्या सोडण्यात येण्याची घोषणा करण्यात येते मात्र गाड्यांची संख्या अपुरी पडत असल्याने आणि मोठ्या गर्दीतुन प्रवास करावा लागत असल्याने कोकणवासिय संताप व्यक्त करतांना पाहायला मिळतायेत.
Leave a Reply