झेडपी शाळा रोल मॉडल बनवा:सीईओ जंगम…आदर्श शिक्षक पुरस्काराचे थाटात वितरण.
माझे आई-वडील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत. शिक्षकांना किती शैक्षणिक, अशैक्षणिक कामे आहेत. याची माहिती मला आहे. ही कामे करुन शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा खाजगी शाळेंनी आदर्श घ्यावा, असे शाळा रोल मॉडल बनवा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने गुरुवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे आदर्श शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सीईओ जंगम बोलत होते. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, माजी जि.प. सदस्या मंगल वाघमोडे, नितीन नकाते, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, रुपाली भावसागर आदी उपस्थित होते. प्रारंभी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी प्रास्ताविक केले.
सीईओ जंगम म्हणाले, विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. आदर्श विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षक पाठ्यपुस्तकांतील अभ्याससह समाजातील इतर ज्ञान विद्यार्थ्यांना देत असल्याने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी अनेक मोठ्या पदावर काम करत आहेत. शिक्षकांनी शिकवलेले 100 टक्के विद्यार्थी समाजात चांगले काम करत असेल तर त्या सारखा दुसरा कोणत्याही चांगला पुरस्कार नाही. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल, यासाठी सातत्याने काम करावे. असे आवाहन केले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले.
Leave a Reply