पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचे सत्कार
सोलापूर:- येथील पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाचे वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचे सत्कार कार्यक्रम संघाचे अध्यक्ष श्रीहरी कुरापाटी यांचे अध्यक्षतेखाली आणि सी.ए. असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरविंद शंकूर यांचे हस्ते आणि लायन्स क्लब आॅफ सेंट्रलचे माजी अध्यक्ष अॅड.श्रीनिवास कटकूर यांचे उपस्थितीत संपन्न झाले.
प्रथम डाॅ.सर्वापल्ली राधाकृष्णन यांचे प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण करण्यांत आले.
संघाचे सचिव यशवंत इंदापुरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी प्रास्ताविक भाषणांत संघाचे विविध कार्याची माहिती दिली.यानंतर अरविंद शंकूर व अॅड. श्रीनिवास कटकूर यांचा शाल,बुके व पेन देऊन सत्कार करण्यात आले.त्यानंतर यादगिरी कोंडा,गोपाळ मुडदिड्डी, सुनिता बरदेपूर, मधुकर संगा व नागेश अन्नलदास यांचा शाल, बुके व पेन देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती शिक्षकांपैकी गोपाळ मुडदाड्डी,सुनिता बरदेपूर व मधुकर संगा यांनी सत्कार केल्याबद्दल आभार मानले नागेश अन्नलदास यांनी समाजातील विद्यार्थ्यांना पुढील जीवनात यशस्वी होण्यासाठी शैक्षणिक मार्गदर्शन व करिअर गाईडन्स करण्यासाठी योगदान देण्याचा मानस व्यक्त केला. यादगिरी कोंडा यांनी अपयशातून यश मिळवण्यासाठी ज्ञानोपासक होऊन प्रामाणिकतेची कास धरली पाहीजे असे सांगितले. तर अरविंद शंकूर यांनी मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांची कल चाचणी घेऊन योग्य मार्गदर्शन करण्याबद्दल सूचित केले. शेवटी श्रीहरी कुरापाटी यांनी अध्यक्षीय भाषणात संघाचे ऑडिट अरविंद शंकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेत आणि अचूक करण्यात आल्याबद्दल आभार मानले.या कार्यक्रमास सेवानिवृत्त संघाचे कार्यकारी सदस्य संगीताताई इंदापुरे, अनिल जन्यारम, अंबादास इंदापुरे , नागेश कोंगारी तसेच संघाचे आजीव सदस्य उमापती मिठ्ठापल्ली, व्यंकटेश गोप, अशोककुमार चिप्पा, अविनाश संगा,नागेश पामुल, दशरथ इंदापुरे, विवेकानंद श्रीपती, विजय चाटला, नागनाथ वड्डेपल्ली , शाम बेनगिरी, वैकुंठम जडल ,संगा व अनेक जेष्ठ नागरीक, विदयार्थ्थी आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होणेसाठी उपाध्यक्ष अनिल कन्ना, सचिव यशवंत इंदापुरे,सहसचिव सत्यनारायण बरदेपूर,देविदास मेरगू आदींनी परिश्रम घेतले. आभार सहसचिव सत्यनारायण बरदेपूर यांनी केले तर आभार खजिनदार नागनाथ गज्जम यांनी मांडले.
Leave a Reply