शहर मध्य मधून उमेदवारीसाठी गोल्डन नगरसेविकेचा बाप्पाकडे साकडे.

शहर मध्य मधून उमेदवारीसाठी गोल्डन नगरसेविकेचा बाप्पाकडे साकडे.

शहरात एरवी अंगावर 125 तोळे सोनू घालून फिरणाऱ्या व गोल्डन नगरसेविका म्हणून परिचित असलेल्या श्रीदेवी फुलारे यांना सात रस्ता येथील रेल्वे लाईन परिसरातील चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने गणपती बाप्पा पूजनाचा मान मिळाला आहे. यावेळी आपल्या हटके लुक मध्ये चंदुकाका सराफ मध्ये एन्ट्री केल्या.अन गणपती बाप्पा कडे येणाऱ्या विधानसभेत उमेदवारी मिळावी अशी साकडे बाप्पा कडे मागितल्याची चर्चा रंगू लागल्या आहेत. यावेळी फुलारे यांनी सराफ मधील सोन्याची दागिने घालण्याचा मोह आवरता आला नाही.. त्यांनी अनेक प्रकारचे दागिने आपल्या गळ्यात घालून सोलापूरकांना आवाहनही केलं.


फुलारे यांनी दि.१६ एप्रिल 2024 रोजी सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण काही कारणाने अर्ज मागे घेऊन ताईंना सपोर्ट केल्या होत्या. आता प्रणिती शिंदे खासदार झाले असून मध्य मधून आता ही पुन्हा महिलेला म्हणजेच माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांना मिळावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. श्रीदेवी फुलारे यांनी आपल्या निधीतून अनेक सामाजिक कामे केली आहेत ,मोदी कब्रस्तान येथे 86 लाखांचा विकास कामांचा तडाखा लावून आपली वेगळी छाप समाजात सोडली होती याची चर्चाही खूप झाली होती. नागरिकांचे प्रश्न असो निवेदने आंदोलने महिलांच्या समस्या आणि आपल्या भूमिकेतून ते काम करून लोकांच्या प्रश्न सोडवत असतात. श्रीदेवी फुलारे यांचे कार्य पाहून आता येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसकडून उमेदवारी मिळणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *