शरद पवार यांच्या विरोधात सकल हिंदू समाज आणि भाजपतर्फे आंदोलन
वाशी येथील एका कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव या वक्त्याने केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूरच्या रामनगर येथे भाजप आणि हिंदु संघर्ष समितीकडून निषेध आंदोलन करण्यात आले. ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांच्या आराध्य दैवतांबाबत वादग्रस्त, आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्ये करत असताना, शरद पवार काहीच बोलले नाहीत. हिंदूंचा होणारा अपमान ते पाहत बसले होते. म्हणजेच हिंदू देवतांच्या अपमानाला त्यांची मूक संमती होती. त्यांच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज आणि भाजप तर्फे नागपूरच्या रामनगर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी रामनगर चौकातील हनुमान मंदिरासमोर श्रीराम जयराम चे नारे देण्यात आले.
Leave a Reply