देशद्रोही नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी गांधीजींचा खून केला. पुन्हा त्यांचीच पिलावळ राहुलजी गांधी यांचा हत्या करण्याची धमकी देत आहेत :- चेतनभाऊ नरोटे
दिनांक:- १३ सप्टेंबर २०२४
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदरसिंह मारवा व भाजप विरोधात सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष अँड नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली, माजी आमदार दिलीपराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शने आंदोलन करून निषेध करण्यात आला.
यावेळी तरविंदरसिंह मारवा आणि भाजप नेत्यांचा विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे म्हणाले की, देशद्रोही नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनी गांधींचा खून केला. आज पुन्हा त्याच देशद्रोह्यांची पिलावळ, संविधानाची रक्षा करणाऱ्या, मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणाऱ्या, हुकूमशाही आणि दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या व भारतात लोकशाही राहावी यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांची हत्या करण्याची गोष्ट करत आहेत. राहुलजी गांधी या धमक्यांना घाबरणारे नाहीत उलट अजून जोमाने जनसेवा करतील त्यांचा आवाज बुलंद करतील. स्व. महात्मा गांधी, स्व. इंदिराजी गांधी, स्व. राजीवजी गांधी, यांची ही हत्या झाली देशासाठी त्यांनी आपल्या प्राणाचे आहुती दिली. गांधी मरत नाही मरणार ही नाही, त्यांचे विचार हजारो लाखो गोडसे आणि त्यांची पिलावळ आले तरीही संपवू शकणार नाहीत. देशात सद्या गोडसेचे उदात्तीकरण सुरू आहे. त्यांचेच विचार मानणाऱ्या लोकांचे सरकार आहे. सत्ताधारी भाजपचा पाठिंबा असल्याशिवाय ही पिलावळ अशी गरळ ओकू शकत नाहीत आणि इतका माज करू शकत नाही. राहुलजी गांधी यांच्या हत्येची भाषा करणाऱ्या तरविंदरसिंह मारवा याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्यात यावी.
या निदर्शने आंदोलनात म. प्रदेश यंग ब्रिगेड चे अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, सुशीलाताई आबुटे, प्रवक्ते अशोक निम्बर्गी, मा. नगरसेवक प्रवीण निकाळजे, रियाज हुंडेकरी, दत्तू बंदपट्टे, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, देवाभाऊ गायकवाड, जुबेर कुरेशी, वाहिद विजापूरे, भीमाशंकर टेकाळे, केशव इंगळे, अशोक देवकते, अनिल मस्के, युवराज जाधव, तिरुपती परकीपंडला, पशुपती माशाळ, N.K. क्षीरसागर, अशोक कलशेट्टी, मयूर खरात, लक्ष्मीकांत साका, रमेश हसापुरे, वसीम पठाण, दीनानाथ शेळके, नूरअहमद नालवार, विवेकानंद, परशुराम सतारेवाले, सागर उबाळे, चैतन्य घोडके, रुपेश गायकवाड, प्रवीण वाले, श्याम केंगार, शिवशंकर अजनाळकर, सिकंदरताज पटेल, हरुण शेख, लखन गायकवाड, विनायक अल्ले, धीरज खंदारे, चिदानंद सुंटे, इरफान शेख, नागेश म्हेत्रे, इलियास शेख, शकील शेख, रुस्तुम कंपली, संजय गायकवाड, सुभाष वाघमारे, गिरीधर थोरात, पवन गायकवाड, धीरज थोरात, सुबोध सुतकर, सुमन जाधव, शोभा बोबे, अंजली मंगोडेकर, संघमित्रा चौधरी, करिमुनिस्सा बागवान, रेखा बीनेकर, रतन डोळसे, सलीमा शेख, चंदा काळे, सुनीता बेरा, ज्ञानेश्वर जाधव, संजय गायकवाड, चंद्रकांत टिक्के, राजेश झंपले, मोहसीन फुलारी, दीपक मठ, शिवाजी साळुंखे, सूरज कांबळे, श्रीशैल रणखांबे, मेहमूद शेख, शकुर शेख, रवी म्याकल, अभिलाष अच्युगटला, मुमताज शेख, स्वप्नील आठवले, मललेश सूर्यवंशी, जगदेवी कदम, अप्पा सलगर, संदीप बंडगर, गेनसिद्ध मोठे, हर्षदीप गायकवाड, दत्तात्रय गजभार, मल्लेश पिल्लोलू, इब्राहीम कलबर्गी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬
Leave a Reply