हजारो रुपये खर्चुन आकर्षक क्रमांक घ्यायचे आणि त्या क्रमांकाला फॅन्सी बनवून वाहनांना लावायचे. अशा फॅन्सी नंबर प्लेट लावलेली वाहने शहरात वावरताना दिसतात. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मोहीम वाहतूक पोलिसांनी हाती घेतली आहे. नंबर प्लेटवर काका, बॉस, दादा अशी नावे टाकली तर त्यांच्यावर 100 टक्के कारवाईचा आमचा वादा, असे खोचक आश्वासन देत वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सुरू केली आहे. शहरातील चौकाचौकांत वाहतूक पोलीस ई चलन डिव्हाइस घेऊन तैनात आहेत. दरम्यान सोलापूर शहर वाहतूक पोलिस शाखेच्या वतीने सोलापूरकरांना आव्हान करण्यात आले आहे की फॅन्सी नंबर प्लेट लावणे व बुलेट सायलेन्सरचे आवाज जोर जोरात करणाऱ्या वाहन चालकांवर सोलापूर वाहतूक पोलिसांची करडी नजर आहे..
Leave a Reply