केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला मुंबई ते भांडुप असा लोकल ने प्रवास
केंद्रिय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबई ते भांडुप असा लोकल ने प्रवास केलाय. भांडुप मधील मराठा गणेशोत्सव मित्र मंडळाच्या गणपती दर्शनाला ते आले होते. यावेळी वैष्णव यांनी भांडुप मधील प्रसिद्ध असा भाऊ चा वडापाववर देखील ताव मारलेला पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी मुंबई मुंबई आहे, मुंबईची संस्कृती ही एक युनिक संस्कृती आहे. भाऊच्या वडापाव मध्ये एक आनंद आहे. हा अनुभव पण एक युनिक आहे. खूपच आनंद झाला. लवकरच लोकल सवेत मोठ्या सुधारणा आम्ही करणार आहोत, आम्हाला राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून खूपच चांगलं सहकार्य मिळत आहे. खूप लवकरच आम्ही मुंबईच्या लोकलमध्ये वाढ देखील करणार असल्याची प्रतिक्रिया वैष्णव यांनी दिली आहे. तसंच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुंबईची जनता महायुतीला आशीर्वाद देईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
Leave a Reply