मंद्रुपच्या महात्मा फुले विद्यालयास तालुकास्तरीय खो- खो स्पर्धेत “दुहेरी मुकुट”
जिल्हा क्रीडा परिषद सोलापूर, दक्षिण सोलापूर पंचायत समिती व सोलापूर क्रीडा शिक्षक असोसिएशन आयोजित तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत मंद्रुपच्या महात्मा फुले विद्यालयाने १७ वर्षे वयोगटात मुलींनी सलग दुसऱ्यांदा तर मुलांच्या संघाने यंदा पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले.
स्वामी विवेकानंद प्रशाला मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत महात्मा फुले विद्यालयाच्या मुलांच्या खो-खो संघाने उपांत्य सामन्यात लोकसेवा शाळेचा ५ गुणांनी पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात कंदलगाव संघाचा ६ गुणांनी पराभव करत तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले.
तसेच, मुलींच्या खो-खो संघाने अंतिम सामन्यात यत्नाळ शाळेचा एकतर्फी पराभव करून सलग दुसऱ्यांदा तालुकास्तरीय विजेतेपद मिळविले.
या दोन्ही संघांची जिल्हास्तरीय होणाऱ्या खो – खो स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या खेळाडूंना संस्थेचे अध्यक्ष पी.एल.कोळी, उपाध्यक्ष चनबसप्पा हविनाळे, सचिव एम.डी.कमळे, नागेश बिराजदार, मुख्याध्यापिका रेणूका दशवंत, क्रिडा शिक्षक सूनिल टेळे, सोमनाथ चव्हाण, शरद व्हनकडे, बबलु शेख, फयाज बागवान यांचे मार्गदर्शन लाभले.
Leave a Reply