श्री शिवशंकर राम विश्व युवा गणेश मंडळ येथे मान्यवरांचा सत्कार, महाप्रसाद आणि महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न

गणेश उत्सव निमित्त काल दिनांक 16/9/2024 सोमवार रोजी फताटेवाडी येथील श्री शिवशंकर राम विश्व युवा मंडळाच्या वतीने महाप्रसाद, मान्यवरांचा सत्कार, आणि महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम पार पडला. प्रथम श्री ची आरती वळसंग पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (API) माननीय अनिल संलग्ने साहेबांच्या हस्ते करण्यात आले.. तसेच मा.यशवंत राठोड यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कारांचा कार्यक्रम पार पडला..या मंडळाच्या माध्यमातून महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम तसेच महिलांचा सत्कार करण्यात आले..सौ अश्विनी ताई रविंद्र राठोड यांचा मंडळा कार्याविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या शब्दास मान देऊन API अनिल संलग्ने साहेबांनी सर्वांना आपले प्रभावशाली विचार मांडण्यात आले.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मा.अनिल संलग्ने साहेब, यशवंत राठोड, गौरीशंकर पट्टणशेट्टी,यादव पोलिस काॅन्स्टेबल साहेब, चव्हाण पोलिस काॅन्स्टेबल साहेब होते..हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेले पदाधिकारी…. आधारस्तंभ नितीन भाऊ चव्हाण, लक्ष्मण राठोड, गोपाल राठोड, अकिल राठोड, संदीप भाऊ चव्हाण,रविंद्र राठोड, संजय राठोड, अप्पू राठोड ,महिला नेतृत्व करणारे सौ अश्विनी ताई रविंद्र राठोड,सर्व महिला पदाधिकारी,मंडळाचे अध्यक्ष आदेश राठोड, तसेच सर्व पदाधिकारी होते…

Categories:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *