दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथे आर ओ प्लाॅंट चे उद्घाटन…
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी येथील आर ओ प्लाॅंट चे उद्घाटन वांगी गावच्या सरपंच सिताबाई खडाखडे ग्रामसेविका अक्कलकोटे राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाउपाध्यक्ष सुभाष बिराजदार सर यांच्यासह वांगी येथील ग्रामस्थ मंडळींच्या हस्ते करण्यात आले.
आमदार दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या आमदार निधीतून वांगी येथील आर ओ प्लाॅंट देण्यात आले असुन ते मंजूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुभाष बिराजदार यांनी अतोनात प्रयत्न करुन आणल्याबद्दल वांगी गावातुन आनंद व्यक्त होत आहे.
या उद्घाटन सोहळाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुभाष बिराजदार आणि सामाजिक कार्यकर्ते सुरज खडाखडे यांनी लोकप्रधान न्युज चॅनल शी बोलताना अधिक माहिती दिली.
या कार्यक्रमास गावच्या सरपंच सिताबाई खडाखडे यांच्यासह ग्रामसेविका अक्कलकोटे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाउपाध्यक्ष सुभाष बिराजदार सामाजिक कार्यकर्ते सुरज खडाखडे महादेव वाघमोडे, राहुल दशवंत, शब्बीर रसुल शेख,चाॅंद मकानदार, फिरोज मुल्ला, हणमंत गुरव सलिम मुल्ला,श्रीशैल जवळकोटे, अशोक जवळकोटे, विठ्ठल सुतार महिबुब मुल्ला,करीम शेख शरणु जवळकोटे, कमलाबाई ठेंगे यांच्यासह वांगी येथील ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते
Leave a Reply